दिंडोरी येथील युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:36 IST2020-11-04T19:21:22+5:302020-11-05T02:36:07+5:30
दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद साधला.

दिंडोरी येथील युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद
दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद साधला.
वणी येथील काही युवासैनिकांनी गवळी यांच्या उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश शिंदे, तालुका अधिकारी किरण कावळे, तालुका समन्वयक किरण कड, उपतालुका अधिकरी राहुल गणोरे, सुनील पवार, गटअधिकारी चेतन उफाडे, वणी शहरप्रमुख जगन सताळे, मोहाडी शहर अधिकारी अक्षय मोगरे आदी युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.