Conveniently equipped polling stations; Efforts to avoid inconvenience | सोयी-सुविधांनी सज्ज मतदान केंद्रे; गैरसोय टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न

सोयी-सुविधांनी सज्ज मतदान केंद्रे; गैरसोय टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न

ठळक मुद्देसुमारे १९६ मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित मतदानयंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली

नाशिक : शहरातील मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न क रण्यात आला. दिव्यांगांपासून सर्वसामान्य मतदारांपर्यंत कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची पुरेपुर दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेल्याचे दिसून येत आहे.
मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. मतदार केंद्रात पुरेशाप्रमाण विद्युतपुरवठाही पहावयास मिळाला. सर्वच मतदान कें द्रांबाहेर स्वच्छता करण्यात आली होती.

१)किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.
२) दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्लूडी अ‍ॅपची सुविधा देण्यात आली आहे.
३) सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हिलचेअर व रॅम्पची व्यवस्था.
४) दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.
५) अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदानयंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
६) लहान मुलासह मतदानास येणा-या महिला मतदारांच्या मुलांकरिताप्रसंगी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.
७)ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुस-या मजल्यावरील सुमारे १९६ मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित.
८) पहिल्या वा दुसºया मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिफ्टची व्यवस्था.

Web Title: Conveniently equipped polling stations; Efforts to avoid inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.