In celebration of the anniversary of Shri Swami Samarth Senior Citizens Association | श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकसंघाचा वर्धापन दिन उत्साहात

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकसंघाचा वर्धापन दिन उत्साहात

ठळक मुद्देन्यायाधीश लोंढे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, इच्छापत्र आदी विषयावर मार्गदर्शन केले.

येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापनदिन संघाचे विरंगुळा केंद्र येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

संघाचे उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश विनायक लोंढे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, डॉ. किशोर पहिलवान, अ‍ॅड. एस. टी. कदम उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी, अ‍ॅड. सुभाष रणवरे, अ‍ॅड. दत्तात्रय चव्हाण, सेवानिवृत्त न्यायाधीश लोंढे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, इच्छापत्र आदी विषयावर मार्गदर्शन केले.

नगराध्यक्ष क्षिरसागर यांनी नगरपरिषदेच्या वतीने विरंगुळा केंद्राचे परिसरात कंपाऊंड तसेच डांबरी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. डॉ. पहिलवान यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास यमुना वाणी, शामसुंदर काबरा, राजेंद्र आहेर, राजेंद्र चिनगी, विजय पोंदे, राजेंद्र वडे, गोविंद खराडे, अनिल तरटे, दिलीप पाटील आदींसह ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य उपस्थित होते. 

Web Title: In celebration of the anniversary of Shri Swami Samarth Senior Citizens Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.