ठेंगोडा गटात बोरसे यांचा प्रचार दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:44 AM2019-10-09T00:44:31+5:302019-10-09T00:47:22+5:30

सटाणा : बागलाण मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त साधून व ठेंगोडा येथील स्वयंभू गणपतीला नारळ वाढवून सकाळी नऊ वाजता ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.

Borse's publicity tour of the Thongoda group | ठेंगोडा गटात बोरसे यांचा प्रचार दौरा

बागलाण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ ठेंगोडा गटात काढलेली प्रचारफेरी.

googlenewsNext
ठळक मुद्दे ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात

सटाणा : बागलाण मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त साधून व ठेंगोडा येथील स्वयंभू गणपतीला नारळ वाढवून सकाळी नऊ वाजता ठेंगोडा गटात प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती अहिरे, माणिक अहिरे, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, सुरेश मोरे, अण्णासाहेब सावंत, साहेबराव सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप बोरसे यांनी निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. १९९५च्या निवडणुकीत जनतेने मला विश्वासाने निवडून दिल्यानंतर तत्कालीन युती सरकारच्या काळात सिंचन प्रश्नांना हात घालून हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ या प्रकल्पांना मंजुरी मिळवून कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. शेतीला पाणी, टॅँकरमुक्त तालुका, गाव आणि शिवार तेथे रस्ता, पिकाला योग्य भाव, मोफत शिक्षण यांच्यासाठीच आपला लढा राहणार आहे, असे बोरसेंनी यावेळी सांगितले.
या प्रचार दौºयात सेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, संदीप खैरनार, शरद शेवाळे, राजनसिंग चौधरी, मोरेनगरचे सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच भरत अहिरे, दºहाणेचे सरपंच परशुराम पाकळे, संदीप पवार ,रुपाली पंडित, आराईच्या सरपंच मनीषा अहिरे, भाक्षीच्या सरपंच पूनम सूर्यवंशी, ठेंगोड्याचे सरपंच मधुकर व्यवहारे, शांताराम वाघ, जिभाऊ जाधव, रामदास बागुल, चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे, जितेंद्र गांगुर्डे, डॉ. गोकुळ अहिरे, सुरेश अहिरे, दिलीप अहिरे, जुने निरपूरचे प्रवीण सूर्यवंशी, गोरख चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, चेतन वाघ, नवे निरपूरचे सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी, दादा पगारे आदी सहभागी झाले होते.सटाण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभाबागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ शहरातील पाठक मैदानावर बुधवारी (दि.९) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. या सभेस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली.

Web Title: Borse's publicity tour of the Thongoda group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.