अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 04:52 PM2020-11-19T16:52:33+5:302020-11-19T16:53:35+5:30

नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे,  प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,  शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत,  विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.

Ashok Kumawat's book release ceremony held | अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात लीना बनसोड, नितीन मुंडावरे, रविंद्र नाईक, बाळासाहेब सानप, पुनम मोगरे, प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, विलास पोतदार, प्रा. राज शेळके, नामदेव बेलदार, अशोक कुमावत मान्यवर.

Next
ठळक मुद्दे लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.

नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे,  प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,  शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत,  विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, भारताचे संविधान, गीता, भागवत, महात्मा फुले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांचे पूजन प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले.
'उठा तुम्हीही जिंकणारच' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करून लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी आपल्या मनोगतातुन उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढत हे पुस्तक इतिहास घडवत अनेकांना सकारात्मक प्रेरणा देईल. या प्रेरणादायी लेखमालेतुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखकाचे लेख सोसियल माध्यमातून अनेकां पर्यंत पोहचले आहे. जग बदलू पाहणाऱ्या कर्तृत्वाची संघर्षगाथा म्हणजे 'उठा तुम्हीही जिंकणारच'हे पुस्तक साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळविणार यात शंका नाही.
नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी मा.रवींद्र नाईक यांनीही मनोगतातून पुस्तकाच्या यशाबद्दल शुभेच्छा देत वाचन संस्कृतीस यातून चालना मिळेल. तरुणांना विविध प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती होईल.
कार्यक्रमास संतोष बेलदार, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त नामदेव बेलदार, मुख्याध्यापक भगवान पाटील, दिगंबर बागड, दामोदर बच्छाव, भूषण कुमावत, दिलीप कुमावत, विमल कुमावत, निकिता कुमावत, साक्षी कुमावत, प्रथमेश बेलदार, अथर्व कुमावत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रविंद्र मालूनजकर यांनी तर आभार नामदेव बेलदार यांनी केले.

Web Title: Ashok Kumawat's book release ceremony held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app