येवल्यात ४२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:49 IST2021-05-09T21:08:45+5:302021-05-10T00:49:34+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ४२ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि.९) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. ...

येवल्यात ४२ पॉझिटिव्ह
ठळक मुद्देतीन बाधितांचा मृत्यू
येवला : शहरासह तालुक्यातील ४२ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि.९) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. १०१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर १४३ संशयितांचे स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत.
४२ बाधितांमध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील ४१ जणांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत १८४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४५०१ झाली असून, यापैकी ४०९९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या २१८ इतकी आहे.