नंदुरबारमध्ये एसटी बसचालक दारूत तर्रर, आगार व्यवस्थापकाशी घातली हुज्जत
By मनोज शेलार | Updated: August 11, 2023 17:10 IST2023-08-11T17:10:36+5:302023-08-11T17:10:48+5:30
अक्कलकुवा आगार व्यवस्थापक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अनिल वसंत साबळे (४०, शिरपूर आगार) असे बसचालकाचे नाव आहे.

नंदुरबारमध्ये एसटी बसचालक दारूत तर्रर, आगार व्यवस्थापकाशी घातली हुज्जत
नंदुरबार : दारू पिऊन एसटी बस चालवत प्रवाशांशी हुज्जत घालणाऱ्या शिरपूर आगाराच्या चालकावर तळोदा पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा आगार व्यवस्थापक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अनिल वसंत साबळे (४०, शिरपूर आगार) असे बसचालकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, शिरपूर आगाराची बस (क्रमांक एमएच २० बीएल ४१२७) अक्कलकुवाकडे जात होते. तळोदा स्थानकात चालक दारू प्यायल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशांनी चालकाला याबाबत विचारणा केल्यावर चालकाने त्यांच्याशी वाद घातला. अक्कलकुवा आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे यांच्याशीही त्यांनी वाद घातला व शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत आगार व्यवस्थापक रवींद्र बाळासाहेब मोरे यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात चालक अनिल साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी हर्षल साळुंखे करीत आहे.