सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल, दोन हजार ७०० घोडे विक्रीला

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: January 1, 2024 18:10 IST2024-01-01T18:10:31+5:302024-01-01T18:10:51+5:30

बहुतांश घोड्यांनी अश्वस्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारली.

Sarangkheda horse market turnover of three crores, two thousand 700 horses for sale | सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल, दोन हजार ७०० घोडे विक्रीला

सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल, दोन हजार ७०० घोडे विक्रीला

रमाकांत पाटील, नंदुरबार: राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे.सारंगखेडा यात्रेत यंदा विक्रमी अर्थात दोन हजार ७०० घोडे विक्रीला आले आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, बिहार, यासह विविध राज्यातील घोडे विक्रीसाठी आले आहेत. त्यातील बहुतांश घोड्यांनी अश्वस्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारली.

सोमवार अखेर या यात्रेत एकूण ६९७ घोड्यांची विक्री झाली असून, त्यातून दोन कोटी ९६ लाख ८८ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. जवळपास ६० पेक्षा अधिक घोडे एक लाखाहून अधिक किमतीत विक्री झाले आहेत. ही यात्रा ९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, यंदा साधारणत: पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक तीन कोटी ७२ लाख रूपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे यंदाची उलाढाल गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sarangkheda horse market turnover of three crores, two thousand 700 horses for sale