नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या
By मनोज शेलार | Updated: June 12, 2023 17:15 IST2023-06-12T17:14:51+5:302023-06-12T17:15:58+5:30
युवकाच्या सासरच्या सात जणांविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या
नंदुरबार : सासरच्या लोकांनी भांडण केले आणि पत्नीला नांदावयास पाठविले नाही यामुळे मनस्ताप करून युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना खापरखेडा,ता.शहादा येथे घडली. याबाबत युवकाच्या सासरच्या सात जणांविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा राणाजी पाडवी (२६) रा.खापरखेडा, ता.शहादा असे मयत तरुणाचे नाव आहे. धडगाव येथील राणाजी पुरुषोत्तम पाडवी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलाचा विवाह खापरखेडा येथील युवतीशी झाला होता. परंतु सासरची मंडळी नेहमीच विविध कारणांनी पाडवी यांच्याशी भांडण करीत होते. शिवाय महिलेला कृष्णाकडे नांदवण्यास देखील पाठवत नव्हते. यामुळे मनस्ताप करून कृष्णा याने खापरखेडा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येस सासरी मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करून सात जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून मकू देवसिंग भिल (५०), मनोज मकू भिल (२२), लिलाबाई मकू भिल (४६), पूनम कृष्णा भिल (२४), गणेश मकू भिल (२२), शिलू पिंटू भिल (३०), लताबाई गुरू भिल (३५) सर्व रा.खापरखेडा, ता.शहादा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ करीत आहे.