एटीएममध्ये भरणा करण्याची एक कोटी पाच हजाराची रक्कम घेऊन कर्मचारी पसार
By मनोज शेलार | Updated: August 14, 2023 21:01 IST2023-08-14T21:01:20+5:302023-08-14T21:01:53+5:30
याप्रकरणी रायटर कंपनीचे अधिकारी याबाबत फिर्याद देणार असल्याचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

एटीएममध्ये भरणा करण्याची एक कोटी पाच हजाराची रक्कम घेऊन कर्मचारी पसार
मनोज शेलार/नंदुरबार : बॅकेच्या एटीएममध्ये रोख रक्कमेचा भरणा करणाऱ्या व्हॅन वरील कर्मचाऱ्यानेच व्हॅन मधील तब्बल एक कोटी ५ हजार रुपयाच्या रक्कमेवर डल्ला मारला. कर्मचारी रक्कम घेऊन पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
राकेश महेंद्र चौधरी (२४)रा.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या एटीएम मध्ये रोकडभरण्यासाठी कॅश घेवून ही व्हॅन (क्रमांक एमएच ०४ जेके ६२६९) दुपारी १२ वाजता रवाना झाली होती. एका फायनान्स कंपनीची कॅश गोळा करण्यासाठी काही कर्मचारी धुळे चौफुली येथे थांबून त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालायत गेले होते. अशातच या व्हॅन मध्ये कार्यरत असलेल्या राकेश चौधरी याने अन्य दोन साथीदारांना मी पोलीस मुख्यालयातील एटीएम मध्ये बाईकवर जावून रोकड टाकून येतो असे सांगत व्हॅन मधील १ कोटी पाच लाखांची रोकड काढून एका पिशवीत टाकून तो पसार झाला. तो काही काळात परत न आल्याने त्या व्हॅन वरील अन्य कर्मचाऱ्याने आपल्या रायटर या कंपनीला ही माहिती दिली.
यानंतर पोलीसांच्या ११२ वर घटनेची माहीती देण्यात आली. दरम्यान पोलीसांना तब्बल दोन तास उशीराने हा प्रकार कळविण्यात आला. तो पर्यंत संशयीताने पोबारा केला होता. त्याचे दोन्ही फोन देखील बंद आहेत. घटनेची माहिती मिळताच
पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी संजय महाजन,एलसीबीचे निरिक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयीताच्या शोधासाठी पथके स्थापन केले असून ते राज्यातील विविध भागासह गुजरातमध्ये पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी रायटर कंपनीचे अधिकारी याबाबत फिर्याद देणार असल्याचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.