नंदुरबारच्या शहाद्यात पायी जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात टाकला दगड

By मनोज शेलार | Updated: April 3, 2023 17:31 IST2023-04-03T17:31:35+5:302023-04-03T17:31:51+5:30

अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A stone was thrown on the head of a youth who was walking in Nandurbar's Shahada | नंदुरबारच्या शहाद्यात पायी जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात टाकला दगड

नंदुरबारच्या शहाद्यात पायी जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात टाकला दगड

नंदुरबार : रात्री पायी जाणाऱ्या एकाच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना शहादा येथील खेतिया रस्त्यावर घडली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, भूषण सुभाष सावळदेकर (वय २०, रा. आझादनगर, लोणखेडा) हा युवक शहादा येथील खेतिया रस्त्याने पायी जात होता.

पाडळदा चौफुलीजवळ आला असता त्याला कुणीतरी मागून दगड मारून फेकला. तो त्याच्या डोक्यात लागला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत तो तेथे खाली बसला. त्यावेळी त्याने मागे पाहिले असता तीनजण अंधारात रस्त्याच्या कडेला लपले. भूषण याने तेथून जवळच असलेल्या वस्तीतील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात रिकामटेकड्या युवकांचा त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी टोळक्याने बसून युवक वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्यांना त्रास देत असतात. त्यामुळे पोलिसांनी अशा युवकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: A stone was thrown on the head of a youth who was walking in Nandurbar's Shahada