महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा नंदुरबार नजीकचा पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल

By मनोज शेलार | Updated: September 29, 2022 11:15 IST2022-09-29T10:48:36+5:302022-09-29T11:15:00+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला तडे गेले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

A bridge connecting Maharashtra-Gujarat near Nandurbar collapsed | महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा नंदुरबार नजीकचा पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा नंदुरबार नजीकचा पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल

मनोज शेलार

नंदुरबार: महाराष्ट्र व गुजरात ला जोडणारा व राज्य मार्ग क्रमांक ६ वर असलेला रंका नदीवरील धानोरा ते ईसाईनगर दरम्याचा  पूल गुरूवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला तडे गेले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरूवारी सकाळी अचानक मोठा आवाज करीत हा पूल कोसळला. एकुण सहा गाळ्यांपैकी तीन गाळे कोसळले. सुदैवाने या वेळी एकही वाहन जात नव्हते त्यामुळे जीवीत हानी झाली नाही. हा मार्ग नंदुरबार ते गुजरात मधील उच्छल व पुढे सुरत जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मार्गावर वाहतूक असते. आता पूल कोसळल्याने गुजरात कडील वाहतूक ठप्प होणार आहे.  या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: A bridge connecting Maharashtra-Gujarat near Nandurbar collapsed