Maharashtra Election 2019: Please remember to vote | Maharashtra Election 2019 : किती सांगू मी तुम्हा धनी, मतदान करायचं ठेवा ध्यानी
Maharashtra Election 2019 : किती सांगू मी तुम्हा धनी, मतदान करायचं ठेवा ध्यानी

ठळक मुद्दे 'मतदार दाता जागा हो आता, सोड काम धंदा -मतदान कर तू यंदा '

हणेगाव : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्षाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़१० आॅक्टोबर रोजी देगलूर तालुक्यातील  मरखेल, हणेगाव, वझर, पुंजरवाडी, लोणी तांडा येथे किती सांगू मी तुम्हा धनी, मतदान करायचं ठेवा ध्यानी, अशी गीते सादर करीत अभिनव पद्धतीने मतदान जागृती करण्यात आली़ 

देगलूर-बिलोली मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोलीचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्ष प्रमुख हमीद दौलताबादी  यांच्या मार्गदर्शनाखाली  गुरुवारी तालुक्यातील करडखेड, मरखेल, हणेगाव, लोणी या गावांत मतदान जागृती करत, ही टीम देगलूर तालुक्यातीललोणी तांडा, पुंजरवाडी येथे पोहोचली. मूलभूत सुविधा नसलेल्या अतिशय  दुर्गम भागातील या छोट्याशा गावातील एका मंदिरासमोर तेथील लोकांना जमविण्यात आले. लोकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी संगीत शिक्षक पंचशील सोनकांबळे, वर्षा वनंजे, भाग्यश्री कांबळे, मनीषा नरबागे, पल्लवी वाघमारे,         प्रणिता गायकवाड, अश्विनी घाटे  यांनी गीत, लोकगीत व पथनाट्य सादर केले़ 

यामध्ये  'मतदान करण्या आळस करू नको माय,मतदान करून घे गं जनाबाई' व 'मतदार दाता जागा हो आता, सोड काम धंदा -मतदान कर तू यंदा ' अशा अनेक लोकगीतांतून या टीमने मतदानाचे महव पटवून दिले. शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी, स्विप कक्ष सहाय्यक प्रा. डॉ. बा. रा. कतुरवार,शिवानंद स्वामी,  प्रा.महेश कुडलीकर, अब्दुल माजिद, मुख्तार सर, सुरेश दुगमोड ,नितीन गोजे, संगीत शिक्षक पंचशील सोनकांबळे, उमाकांत पाटील, अतुल ठाणेकर आदींनी परिश्रम घेतले.


Web Title: Maharashtra Election 2019: Please remember to vote
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.