Maharashtra Election 2019 : 75 complaints filed by Congress from Marathwada regarding EVM | Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी
Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी

नांदेड : विधानसभेसाठी मतदानास सोमवारी सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला़  नांदेडसह अनेक ठिकाणी पावसामुळे  सुरुवातीचा काही वेळ मतदानात अडथळे आले असले तरी सकाळी ९ नंतर सर्वत्र मतदानाने वेग घेतलेला आहे़ दरम्यान, मतदान यंत्र बंद पडण्याबरोबरच व्हीव्हीपॅट संदर्भातही तांत्रिक अडचणी येत आहेत

या संदर्भात काँगे्रसच्या वतीने मराठवाड्यातून दुपारपर्यंत सुमारे ७५ तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत़ तर राज्यभरातून २२१ तक्रारी आयोगाकडे काँग्रेसने केल्या आहेत़ यामध्ये सर्वाधिक १३ तक्रारी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाबद्दलच्या आहेत़ तर नांदेड दक्षिणमधून १०, नांदेड उत्तर ९, भोकर, हदगाव, परतूर आणि पाथरी या मतदारसंघातून प्रत्येकी ५, जालना आणि लातूर शहर मतदारसंघातून प्रत्येकी ४, वैजापूरमधून ३ तर हिंगोली, पैठण, फुलंब्री या मतदारसंघातून प्रत्येकी एक तक्रार आयोगाकडे गेली असून औसा, किनवट, मुखेड, तुळजापूर या मतदारसंघातून प्रत्येकी १ तक्रार काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत़ याच पद्धतीने राज्यभरातून १२१ तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहितीही काँग्रेसच्या सूत्रांनी दिली़

Web Title: Maharashtra Election 2019 : 75 complaints filed by Congress from Marathwada regarding EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.