Nagpur East Election Results : पूर्व नागपुरात पुन्हा खोपडे : हॅट्ट्रिक साधूनही मतांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:44 AM2019-10-25T00:44:18+5:302019-10-25T00:46:31+5:30

Nagpur East Election Results 2019 :Krushna Khopade Vs Puroshottam Hajare,Maharashtra Assembly Election 2019

Nagpur East Election Results: Krushna Khopade Vs Puroshottam Hajare | Nagpur East Election Results : पूर्व नागपुरात पुन्हा खोपडे : हॅट्ट्रिक साधूनही मतांमध्ये घट

Nagpur East Election Results : पूर्व नागपुरात पुन्हा खोपडे : हॅट्ट्रिक साधूनही मतांमध्ये घट

Next
ठळक मुद्देचिंता मताधिक्य घटण्याची

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपूर क्षेत्रामध्ये भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी २४ हजार १७ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला आणि हॅट्ट्रिक साधली. त्यांना एकूण १ लाख ३ हजार ९९२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना ७९ हजार ९७५ मते मिळाली. खोपडे यांच्या विजयातील फरक मोठा असला तरी गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत घटलेले मताधिक्य हा पक्षात सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरला आहे.
या मतदार संघात आठ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सागर लोखंडे ५ हजार २८४ मते घेऊन तिसऱ्या क्रमावर राहिले. वंचित बहुजन आघाडीचे मंगलमूर्ती सोनकुसरे यांना फक्त ४ हजार ३३८ मते मिळाल्याने चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ७१ हजार ८९३ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९८ हजार ६४१ जणांचे मतदान झाले. ३ हजार ४६० मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. ४३२ पोस्टल मतदानांची मोजणी झाली. यातही चार मतदारांनी नोटाचा वापर केला, हे विशेष!
भाजपाचे कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्यातच थेट लढत झाली. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयात झालेल्या मतमोजणीत सकाळी पहिल्या फेरीपासूनच खोपडे यांनी मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत ३ हजार ४८९ मतांची आघाडी घेऊन त्यांनी आपल्या विजयाचे संकेत दिले. या फेरीत त्यांना ६ हजार ४४२ मते मिळाली तर पुरुषोत्तम हजारे यांना २ हजार ९५३ मते मिळाली. दुसºया फेरीत खोपडे यांनी एकदम दुप्पट १२ हजार ४६० मते घेतली तर हजारे यांना ७ हजार ५४९ मते मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत कमी-अधिक फरकाने हेच चित्र राहिले. अखेरच्या फेरीत खोपडे यांनी १ लाख ३ हजार ९९२ मते मिळवून २४ हजार १७ मतांच्या फरकाने विजयाचा तिसऱ्यांदा झेंडा रोवला.
या मतदारसंघामध्ये रिंगणात असलेल्या आठ उमेदवारांपैकी तीन उमेदवार अपक्ष होते. या तीनही अपक्षांसह छत्तीसगड स्वाभिमान मंचचे गोपालकुमार कश्यप यांची रिंगणातील उपस्थिती मतदारांच्या दृष्टीने फारशी दखलपात्र दिसली नाही. या चारही उमेदवारांना हजाराचाही आकडा गाठता आला नाही.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १७ फेºया ठरल्या असल्या तरी मोजणीची अठरावी अतिरिक्त फेरी घेण्यात आली.
मतमोजणीदरम्यान ईव्हिएममध्ये बिघाड झाल्याने ही फेरी वाढवावी लागल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांनी सांगितले. सायंकाळी ५.३० वाजता निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात दुपारी १ वाजता आठव्या फेरीनंतरच येथील निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास भाजपाचे कृष्णा खोपडे यांनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली. माध्यम प्रतिनिधींच्या कक्षात येऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. मात्र निकाल घोषित व्हायला वेळ लागत असल्याचे पाहून ते केंद्राबाहेर प्रतीक्षेत असलेल्या कार्यकºर्यांच्या गर्दीत सामील झाले. कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोरच विजयाचा जल्लोष केला. काँगे्रसचे पुरुषोत्तम हजारे मात्र फिरकले नाहीत.

पहिल्या फेरीपासूनच पडले अंतर
पहिल्या फेरीपासूनच खोपडे यांनी मतांची आघाडी घेतली. मतांचे हे पडलेले अंतर हजारे यांना अखेरपर्यंत गाठता आले नाही. मात्र चौथ्या फेरीमध्ये खोपडे यांच्या मताधिक्यात २ हजार २२ मतांनी घट झाली. यामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांचे चेहरे उजळत असतानाच, खोपडे यांनी पाचव्या फेरीमध्ये पुन्हा ७७९ मतांची आघाडी घेतली. १० फेरीपर्यंत त्यांच्या मतांमध्ये वाढ होत गेली. पुन्हा ११ व्या व १२ व्या फेरीत त्यांचे मताधिक्य घटले. मात्र ११ व्या फेरीपासून त्यांनी मुसंडी मारली. ही लीड अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती. पडलेला हा मतांचा फरक हजारे यांना अखेरपर्यंत गाठता आला नाही.

बसपा, वंचितचा प्रभाव नगण्य
या मतदारसंघातून बसपाचे सागर लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे मंगलमूर्ती सोनकुसरे रिंगणात होते. या दोन्ही उमेदवारांनी अनुक्रमे ५ हजार २८४ आणि ४ हजार ३३८ मते घेतली. मतदार संघाचा विचार करता या दोन्ही उमेदवारांना प्रभाव पाडण्यासारखी मते घेता आली नाही. बसपाचे सागर लोखंडे यांच्या मतांची वाढ सुरुवातीपासून १५० ते २०० अशी होती. त्यानंतर १३ व्या फेरीत त्यांची मते जवळपास दोन हजारांनी वाढली. वंचित बहुजन आघाडीचे सोनकुसरे यांच्या मतांमधील वाढही अशीच दिसली. त्यांच्याही मतांमध्ये १३ व्या फेरीत एकदम पावणेआठशे मतांची वाढ झाली; नंतरच्या फेºयांमध्ये दोघांच्याही मतांची वाढ संथपणेच होत राहिली.

ईव्हीएममधील बिघाडामुळे विलंब
मतमोजणीचा वेग सुरुवातीपासूनच चांगला होता. दुपारी ३ वाजता निकाल हाती येतील अशी अपेक्षा होती. मात्र ईव्हीएममधील बिघाडामुळे विलंब झाला. मतदान झाल्यावर क्लोज बटन न दाबल्याने येथील नऊ मशिन्स मतमोजणीसाठी सुरूच होत नव्हत्या. यात बूथ क्रमांक ५, ४५, ७९, १२०, १२३, २२३, २२६ आणि २६८ येथील ईव्हीएमचा समावेश होता. हा प्रकार लक्षात आल्यावर तंत्रज्ञांच्या मदतीने बिघाड दुरुस्त झाल्यावर सर्व फेºयांअखेर मतमोजणी घेण्यात आली. तर बूथ क्रमांक १२० वरील मतमोजणी व्हीव्हीपॅटने करण्यात आली.

जनतेपर्यंत विकास पोहचविण्यात आम्ही मागे पडलो : कृष्णा खोपडे यांची खंत
मागील पाच वर्षांत पूर्व नागपूर मतदार संघात भरपूर विकास कामे केली. वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून निधी खेचून आणला. अनेक प्रकल्प आणले तरीही हा विकास पोहचविण्यात आम्ही मागे पडलो, अशी खंत पूर्व नागपूर मतदार संघातील विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, मागील पाच वर्षांत आणि त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या काळातही भरपूर विकास कामे केली. त्यामुळे यावेळी मोठ्या मतदानाची अपेक्षा आपणास होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी मतदान पडले. याचा अर्थ आम्ही केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात माझ्यासह आमचे कार्यकर्ते कमी पडले, असाच समजावा लागेल. आम्ही नेमके कुठे आणि का कमी पडलो, याचा शोध घेऊन कामामध्ये सुधारणा करू. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातही आम्ही नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार करू, असे ते म्हणाले. जनतेने आपणास पुन्हा आशीर्वाद देऊन तिसºयांदा विधानसभेत पाठविले. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

नेटाने लढलो, मात्र सर्वांची मदत मिळाली नाही : पुरुषोत्तम हजारे
विद्यमान आमदाराच्या तुलनेत मी लहान उमेदवार होतो. पक्षाने लढण्याचा आदेश दिला. कार्यकर्त्यांना घेऊन नेटाने लढलो. पक्षातील सर्वांची मदत अपेक्षित होती. पक्षाने आपणास उमेदवारी दिल्याने सर्वांची मदत अपेक्षित असली तरी तिकीट कटल्याने नाराज झालेल्या नेत्यांची साथ मिळाली नाही. यामुळे चांगले चित्र उमटू शकले नाही. हा मुद्दा आपण वरिष्ठांकडे मांडणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे पराभूत उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
हजारे म्हणाले, डिपॉझिट जप्त होणार असे म्हणणाऱ्यांची तोंडे बंद करण्याइतपत जनादेश आपणास मिळाला आहे, त्याचा आपण सन्मान करतो. निवडणूक प्रक्रियेत आपणास प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. त्यामुळे जनतेपर्यंत पोहचता आले नाही. अनेक भागांमध्ये कार्यकर्त्यांना भेटता आले नाही. सभाही पुरेशा घेता आल्या नाहीत. अशा वेळी पक्षातील स्थानिक नेत्यांची सहकार्याची जबाबदारी होती. आपण त्यांना सहकार्यासाठी विनंती केली. प्रत्यक्ष भेटलो, तरीही म्हणावी तशी साथ मिळाली नाही. ऐन निवडणुकीच्या काळात हे सहकारी मतदार संघाबाहेर फिरत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर लढलो. या सर्व परिस्थितीतही मतदारांनी चांगली साथ दिली. पराभूत झालो असलो तरी त्याच उमेदीने काम करीत राहील, असे ते म्हणाले.

 

Web Title: Nagpur East Election Results: Krushna Khopade Vs Puroshottam Hajare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.