Maharashtra Assembly Election 2019: Speed will be given to development train: Sudhakar Deshmukh | Maharashtra Assembly Election 2019 : विकासाच्या गाडीला स्पीड देणार  : सुधाकर देशमुख
Maharashtra Assembly Election 2019 : विकासाच्या गाडीला स्पीड देणार  : सुधाकर देशमुख

ठळक मुद्देप्रभाग १० मध्ये पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले.
शनिवारी प्रभाग १० मध्ये पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
मंजिदाना कॉलनी गिट्टीखदान चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. अहबाब चौक, अवस्थी चौक, सादिकाबाद कॉलनी,मानकापूर स्टेडियम चौक, पागलखाना चौक, मंगळवारी झोन, छावणी, राज नगर, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत पश्चिम नागपूरचे महामंत्री व प्रभारी सतीश बढे , शिवानी दाणी , युवा मोर्चाचे पदाधिकारी, शहर महामंत्री संदीप जाधव, प्रभाग अध्यक्ष नवनीत श्रीवास्तव, महामंत्री मुकेश मिश्रा, योगेश राऊत,अनिरुद्ध तिवारी, विजय सिंग ठाकूर, डॉ. प्रकाश रणदिवे, डॉ. प्रशांत चोपरा, रमेश चोपडे, बजरंग ठाकूर, ममता ठाकूर, हरीश ठाकूर, शंकर बुरडे, डॉ. उमर खान, संजय मोहोड, संध्या ठाकरे आदी सहभागी झाले होते.


Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Speed will be given to development train: Sudhakar Deshmukh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.