Maharashtra Assembly Election 2019: Milind Mane stressed on padyatra | Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर 
Maharashtra Assembly Election 2019 : मिलिंद माने यांचा पदयात्रेवर भर 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी अखेरच्या दिवशीही पदयात्रेवरच भर दिला. प्रभाग क्रमांक ६ मधील अशोकनगर, मिलिंदनगर, वैशालीनगर बौद्ध विहार, बाबा बुद्धनगर, महर्षी दयानंदनगर, सुजातानगर, व्ही. एच. बी. क्वार्टर, पंचशीलनगर, गुरुद्वारा, एकता कॉलनी, हाऊसिंग बोर्ड, यादवनगरात पदयात्रा काढत त्यांनी नागरिकांना साकडे घातले. पदयात्रेत भाजपचे उत्तर मंडळाचे अध्यक्ष दिलीप गौर, उत्तर नागपूर भाजप निवडणूक प्रमुख नगरसेवक विक्की कुकरेजा उपस्थित होते. पदयात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून डॉ. माने यांना विकासकामांचा धडाका लावण्याची विनंती केली. यावेळी लाला कुरेशी, आनंद अंबादे, सुधीर जांभुळकर, प्रकाश वानखेडे, अशोक डोंगरे, पाशा खान, अ‍ॅड अशफाक डल्लु सरदार, रवींद्र डोंगरे, उपेंद्र वालदे, नलु बनसोड, जितु ठाकूर, प्रकाश मालवी, रितेश वासे, जय साजवानी, देवका गजभिये, मनीष मडके, संदीप नागोसे, विनोद कोटांगळे, धीरज शाहू, गोपाळ राऊत, शिवचरण यादव, मोहन चव्हाण, संगीता कुकडे, माधुरी अंबादे, मीना फांदे, आकाश घोडाकाडे, गुरुमितसिंग बावरी, शेषराव तरारे, घनशाम धकाते, पंकज गुप्ता, असलम खान, अतिक अहमद, रमेश रहाटे, शिव कश्यप, रोशन भगत, धनराज पराते, अरविंद बेदले, शंकर तळप, रमेश फाले, दिनेश कुकडे, चंद्रकांत सदावर्ते, खेमराज दमाहे उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Milind Mane stressed on padyatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.