बाप्पाचा ऑनलाईन गजर; नव्या गीतांतून गायली जातेय श्रीगणेशाची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 07:45 AM2021-09-19T07:45:00+5:302021-09-19T07:45:01+5:30

Nagpur News श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक हौशी कलावंत आपल्या आराध्याला गेय रचनांनी श्रद्धासुमने अर्पित करीत आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर श्रीगणपती विशेष साँग्ज प्रदर्शित केले जात आहेत.

Bappa's online alarm is sung in new songs | बाप्पाचा ऑनलाईन गजर; नव्या गीतांतून गायली जातेय श्रीगणेशाची महती

बाप्पाचा ऑनलाईन गजर; नव्या गीतांतून गायली जातेय श्रीगणेशाची महती

Next
ठळक मुद्दे गणराजरंगी रंगले हौशी कलावंतनवे गीतकार-गायक येत आहेत भेटीला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बाप्पा श्रीगणेश हे विद्येचे आराध्य दैवत. त्याला गुणपतीही म्हटले जाते आणि म्हणूनच कुठलीही कला सादर होताना सर्वप्रथम श्रीगणेशाचे गुणगान गाणारी नांदी म्हटली जाते. नांदीचे हे स्वरूप शाब्दिक प्रार्थनेचे, काव्याचे तर कधी गेय अर्थात गायले जाणारे असते. श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक हौशी कलावंत आपल्या आराध्याला गेय रचनांनी श्रद्धासुमने अर्पित करीत आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर श्रीगणपती विशेष साँग्ज प्रदर्शित केले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्सवावर काही प्रमाणात निर्बंध असले तरी बाप्पाचा ऑनलाईन गरज जोराशोरात सुरू आहे.

अभिजित जोशींचे ‘प्रणम्य शिरसा देवं’

सध्या मुुंबईत आपल्या प्रतिभेचा लोहा सिद्ध करीत असलेले नागपूरचे गीतकार, संगीतकार अभिजित जोशी यांनी ‘प्रणम्य शिरसा देवं’ हे स्तोत्र नव्या रूपात सादर केले आहे. या स्तोत्रावर नवी शॉर्टफिल्म त्यांनी तयार केली आहे आणि त्याचे संपूर्ण चित्रीकरण नागपुरात पार पडले आहे. विशेष म्हणजे, यात संगीतकार अजय अतुल, पद्मभूषण बालासुब्रह्मण्यम यांनी स्वर दिले आहे. जागेश्वर ढोबळे, मुकुंद वसुले, वैदेही चवरे, हिमानी बल्लाळ, अमित धनराज, आदी कलावंतांनी यात सहभाग घेतला आहे.

 

नितीन ठाकरे यांचे ‘गणराया’

नाट्यलेखक, गीतकार व अभिनेते तसेच लघुपट निर्माते नितीन ठाकरे यांचे ‘गणराया’ हे साँग नुकतेच त्यांच्या नाटुकला या प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाले आहे. प्रशांत खडसे यांचे संगीत व सारंग खडसे यांचा स्वर असलेल्या श्रीगणेशाला समर्पित या गीताचे चित्रीकरण शहरातील वेगवेगळ्या मंडळांतील गणेशापुढे झाले आहे. स्वप्निल बनसोड, सार्थ गायकवाड, मुकुल काशीकर, संचित वराडे यांनी यात सहभाग घेतला आहे.

 

पूजा मंगळमूर्ती यांचा ‘बाप्पा’

अभिनेत्री पूजा मंगळमूर्ती यांची संकल्पना असलेली ‘बाप्पा’ हे लघुपट दोनच दिवसापूर्वी प्रदर्शित झाले. महिलेची बदलती वेशभूषा, संस्कार आणि मानवी वृत्ती यांवर प्रकाश टाकणाऱ्या या लघुपटाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. यात महेश रायपूरकर, लकी तांदूळकर, प्रशांत शेंडे, अंकुश ढोले, श्रेयस सोलकर, वैशाली डहाके यांचा सहभाग आहे.

..............

Web Title: Bappa's online alarm is sung in new songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.