Ganesh Mahotsav; नितीन गडकरी, अनिल देशमुख व रमेश बंग यांच्या निवासस्थानी श्रींचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:25 IST2020-08-22T20:23:30+5:302020-08-22T20:25:39+5:30
केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

Ganesh Mahotsav; नितीन गडकरी, अनिल देशमुख व रमेश बंग यांच्या निवासस्थानी श्रींचे आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गडकरी यांचे चिरंजीव सारंग गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली. याप्रसंगी पत्नी कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सावनी व नंदिनी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोरोनाचे संकट टळावे व जगात आरोग्य नांदावे, यासाठी त्यांनी गणरायाला साकडे घातले.
राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांच्याही निवासस्थानी मोठ्या उत्साहात गणेशस्थापना करण्यात आली. अनिल देशमुख यांनी गणेशमूर्ती स्वत: जाऊन आणली व कुटुंबियांसह पूजन केले. हिंगणा येथील निवासस्थानी रमेश बंग यांनी आपल्या कुटुंबियांसह कोरोनाचे संकट लवकर जावे, अशी प्रार्थना श्रीचरणी केली.