जि.प, पं. स.च्या निवडणूकीसाठी २ हजार व्होटींग मशीन

By Admin | Updated: January 15, 2015 23:21 IST2015-01-15T23:21:44+5:302015-01-15T23:21:44+5:30

लोकसभा आणि विधानसभेच्या धरतीवर २८ जानेवारी होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Zip, pt. 2 thousand voting machines for the election | जि.प, पं. स.च्या निवडणूकीसाठी २ हजार व्होटींग मशीन

जि.प, पं. स.च्या निवडणूकीसाठी २ हजार व्होटींग मशीन

ठाणे : लोकसभा आणि विधानसभेच्या धरतीवर २८ जानेवारी होणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तशी तयारी सुरु केली असून निवडणूकीसाठी लागणाऱ्या दोन हजार बॅलेट युनीट मशीन मुंबईतून मागवण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसह पाच पंचायत समित्यांच्या ११० जागांसाठी एक हजार २१३ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. मात्र,संवेदन आणि अतिसंवेदन केंद्राबाबत अद्यापही पोलिसांकडून कोणत्याप्रकारे शिक्कामोर्तब झाले नसल्याने ती केंद्रे जाहिर करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्याचे विभाजनामुळे ठाणे व पालघर दोन जिल्हे अस्तित्वात आले आहे.

Web Title: Zip, pt. 2 thousand voting machines for the election