वडवळ टोलनाका बंद

By Admin | Updated: June 1, 2015 22:26 IST2015-06-01T22:26:36+5:302015-06-01T22:26:36+5:30

जिल्ह्यात सरकारच्या टोल बंद करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अलिबाग- पेण- खोपोली या राज्य मार्गावरील खालापूरजवळील

Wonderless tollenas off | वडवळ टोलनाका बंद

वडवळ टोलनाका बंद

खालापूर : जिल्ह्यात सरकारच्या टोल बंद करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अलिबाग- पेण- खोपोली या राज्य मार्गावरील खालापूरजवळील वडवळ टोलनाका बंद करण्यात आला. या निर्णयाचे वाहनचालकांकडून स्वागत करण्यात आले.
टोलबंदीची अंमलबजावणी होताच टोल व्यवस्थापकांनी, टोलनाक्यावरील संगणक काढून नेले. पुण्याहून रायगडात येताना खालापूरमधला वडवळ टोलनाका, आणि पेणजवळ धरमतर टोलनाका होता. हे दोन्ही टोलनाके बंद झाले आहेत.
जिल्ह्यातील बहुचर्चित खारघरमधील टोलनाक्यावरही टोलमुक्ती झाल्याने स्थानिकांसह प्रवासी समाधानी आहेत. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाका वगळता एकंदर रायगड जिल्हा आता टोलमुक्त झाला आहे.

Web Title: Wonderless tollenas off