पाण्याचे भांडण पोलीस ठाण्यात

By Admin | Updated: February 9, 2015 01:57 IST2015-02-09T01:57:54+5:302015-02-09T01:57:54+5:30

माझगावमधील हिराबाई कम्पाउंडमध्ये रहिवाशांत पाण्यावरून झालेल्या भांडणाने शनिवारी रात्री थेट भायखळा पोलीस ठाणे गाठले

Water dispute in police station | पाण्याचे भांडण पोलीस ठाण्यात

पाण्याचे भांडण पोलीस ठाण्यात

मुंबई : माझगावमधील हिराबाई कम्पाउंडमध्ये रहिवाशांत पाण्यावरून झालेल्या भांडणाने शनिवारी रात्री थेट भायखळा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी उमर खलील शेख उर्फ जग्गा (४०), दानिश अब्दुल रशिद शेख (१८), मोहसिन इमदाद कुरेशी (१८) आणि एका अनोळखी आरोपीवर गुन्हा नोंद केला. रविवारी किल्ला न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी ७ हजारांचा जामीन मंजूर केला आहे.
रात्री सव्वाआठ वाजता तक्रारदार जमानउल्ला सैदुल्ला खान (२०) पाणी भरीत होता. त्या वेळी आरोपींनी नळ बंद केला. त्याचा जाब विचारण्यासाठी तरुणाने पुढाकार घेतला असता, चौघा आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यानंतर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले.
मारहाण करणाऱ्या आरोपींत काही जण भारतीय क्रिकेट संघाचा आॅल राउंडर क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या पत्नीचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपाचे खंडन केले आहे. शिवाय काही तासांत आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्याचेही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Water dispute in police station