वरिष्ठ निरिक्षकासह दोघांवर गुन्हा

By Admin | Updated: May 30, 2015 01:53 IST2015-05-30T01:53:27+5:302015-05-30T01:53:27+5:30

खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संजय जाधव आणि एपीआय दिलीप इंगळे या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गुन्हा नोंदविला आहे.

Two offenders including senior observer | वरिष्ठ निरिक्षकासह दोघांवर गुन्हा

वरिष्ठ निरिक्षकासह दोघांवर गुन्हा

मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संजय जाधव आणि एपीआय दिलीप इंगळे या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गुन्हा नोंदविला आहे. एसीबीने दोघांच्या निवासस्थानी छापा घातला. जाधव यांच्या घरात सुमारे ९ लाख ८१ हजार रूपयांची रोकड सापडली. यात खेरवाडी पोलीस ठाण्यातील आणखी एक अधिकारी गुंतल्याचा संशय एसीबीला आहे.
मुंबई महापालिकेत भाडेवसुली सहाय्यक अधिकारी रामचंद्र चव्हाण यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. पनवेलला राहाणारे चव्हाण आणि त्यांच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गेल्यावर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांआधारे फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी चव्हाण यांच्या तीन साथीदारांना अटक केली होती. चव्हाण यांना अटक झालेली नव्हती. २४ एप्रिलला जाधव व इंगळे यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. अटक न करण्यासाठी दोघांनी पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड लाख घेण्याचे मान्य केले. पुढील तपासासाठी हे प्रकरण एसीबीच्या मुंबई विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two offenders including senior observer