Maharashtra Election 2019 : भांडूपमध्ये दोन कार्यकर्ते आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:01 AM2019-10-15T06:01:37+5:302019-10-15T06:02:29+5:30

भांडुप मराठमोळ्या श्रमिकांचा मतदारसंघ आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघाने सेनेला साथ दिली.

Two activists face to face in Bhandup | Maharashtra Election 2019 : भांडूपमध्ये दोन कार्यकर्ते आमने-सामने

Maharashtra Election 2019 : भांडूपमध्ये दोन कार्यकर्ते आमने-सामने

Next

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडुपच्या रणांगणात आजी-माजी नगरसेवकांमधली लढत उत्सुकतेचा विषय झाली आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे नगरसेवक, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तर महाआघाडीतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक सुरेश कोपरकर रिंगणात आहेत.


भांडुप मराठमोळ्या श्रमिकांचा मतदारसंघ आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघाने सेनेला साथ दिली. मात्र २००९मध्ये अभेद्य किल्ला मनसेने हिसकावला होता. मनसेचे शिशीर शिंदे येथे आमदार झाले. कालांतराने सेनेने पुन्हा आपले निशाण येथे फडकावले. मोदी लाट असूनही सेनेच्या अशोक पाटील यांनी किल्ला राखण्यात यश मिळवले होते. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपने ताकद दाखवून देत दोन नगरसेवक निवडून आणले. कोरगावकर यांच्या प्रमाणेच सुरेश कोपरकर हेही अडीअडचणींना धावून जात असल्याने या दोन कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत असेल. मनसेने विभागअध्यक्ष संदीप जळगावकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र अशक्त पक्ष संघटना आणि अंतर्गत गटबाजीमुळे जळगावकर यांना ही लढत खडतर आहे.


उणे बाजू
मराठी मतदारसंघात मनसे रिंगणात असल्याने मतांचे ध्रुवीकरण काही प्रमाणात होऊ शकते. त्यात कॉंग्रेसकडून रिंगणात असलेले कोपरकर यांचा मुस्लीमबहुल तसेच उत्तरभारतीय वस्तीत पकड आहे. तेथील मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड सुरु असली तरी तेथील मतेही आपल्याकडे वळविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
कोपरकर ज्येष्ठ असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली पक्षाच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी भांडुपमध्ये अस्तित्वात नाही. त्या तुलनेत प्रतिस्पर्धी सेना-भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


जमेच्या बाजू
्नरमेश कोरगावकर यांची हरहुन्नरी, मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी मतदारसंघात ओळख आहे. दोन वेळा विधानसभेची उमेदवारी नाकारल्यावरही पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. ते स्वत: कोकणातले असल्यामुळे कोकणी मतदारांचा पाठिंंबा त्यांना मिळू शकेल.
लोकसभा लढतीत भाजपच्या मनोज कोटक यांच्यासाठी कोरगावकर यांनी युतीचा धर्म पाळत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे या लढतीत भाजपचा प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या प्रचारात उतरला आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल.
सुरेश कोपरकर यांनी विविध प्रभागांतून महापालिका निवडणूक जिंकून तेथील नागरिकांसाठी कामे केलेली आहेत.
पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन सर्वांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात.
कामगार संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे संपूर्ण मतदारसंघात त्यांची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी
केली होती.

Web Title: Two activists face to face in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.