अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:41 PM2020-03-27T18:41:39+5:302020-03-27T18:43:54+5:30

पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Thunderstorm accompanied with lightning and rain | अवकाळी पावसाचा इशारा

अवकाळी पावसाचा इशारा

Next

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई  : राज्यातील बहुतांश ठिकाणी सरासरी कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात येत असून, ठिकठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत आहे. मुंबईत देखील काही काळ हवामान ढगाळ नोंदविण्यात येत असून, पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील २४ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली आहे. कोकणच्या कमाल तापमानात किचिंत वाढ झाली आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. मराठवाड्याच्या कमाल तापमानात देखील किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.
२८ मार्च रोजी विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल. २९ मार्च रोजी विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल. ३० मार्च रोजी मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता शनिवारी मुंबई ढगाळ राहील. शनिवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहिल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

Web Title: Thunderstorm accompanied with lightning and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thunderstormवादळ