महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मानापमान नाट्य; काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या गटनेत्यांना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 02:59 AM2020-01-26T02:59:03+5:302020-01-26T02:59:13+5:30

काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या गटनेत्यांनी सभात्याग केला होता. 

Standard drama among the parties leading the development; Congress, nationalist and socialist group leaders were intimidated | महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मानापमान नाट्य; काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या गटनेत्यांना डावलले

महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मानापमान नाट्य; काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीच्या गटनेत्यांना डावलले

Next

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सूर जुळले़ परंतु, महापालिकेत मात्र शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी या पक्षांच्या सदस्यांचे सत्ताधाऱ्यांशी खटके उडू लागले आहेतक़ाही दिवसांपूर्वी स्थायी समितीमध्ये मान-अपमान नाट्य रंगल्यानंतर आता रविवारी होणाºया भूमिपूजनाच्या मेगा कार्यक्रमांवरून वाद उफाळून आला आहे़ या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर पालिकेतील गटनेत्यांसह समिती अध्यक्षांचीही नावे वगळण्यात आली आहेत़ यामुळे संतप्त महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करीत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे़
महालक्ष्मी येथील दोन उड्डाणपूल व लोअर परळ येथील एका उड्डाणपुलाचे भूमिपूजन, राणीबागेतील प्राणी व पक्ष्यांच्या सहा प्रदर्शनी पिंजऱ्यांचे लोकार्पण तसेच मियावकी पद्धतीने शहरी वनीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ च्या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे़ परंतु, या भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेतील गटनेत्यांसह समिती अध्यक्षांचीही नावे वगळण्यात आली आहेत, याकडे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी लक्ष वेधले़
काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या गटनेत्यांनी सभात्याग केला होता. तसेच यापुढेही आपला सन्मान न राखल्यास शिवसेनेची कोंडी करण्याचा इशाराही विरोधी पक्षांनी दिला होता़ मात्र महापालिकेच्या सर्वांत मोठ्या मेगा कार्यक्रमांत राज्यात एकत्र असलेल्या मित्रपक्षाला डावलण्यात आल्याने विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़ हा एक प्रकारे गटनेत्यांसह इतर समिती अध्यक्षांचा अपमान असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रम पत्रिकेवर यांची नावे
या कार्यक्रम पत्रिकेवर राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग-मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपूर, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती आहे़ या सर्वांची नावे कार्यक्रम पत्रिकेवर आहेत़

यांची नावे वगळली
या कार्यक्रमाबाबत वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादीचे गटनेते आमदार रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, भाजपचे गटनेते खासदार मनोज कोटक
आदींच्या नावांचा उल्लेख केलेला नाही.

Web Title: Standard drama among the parties leading the development; Congress, nationalist and socialist group leaders were intimidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.