कमलेश तिवारींच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; शिवसेना नेत्याची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:20 PM2019-10-20T12:20:34+5:302019-10-20T12:21:00+5:30

हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

shivsena leader rs 1 crore reward for beheading kamlesh tiwaris killers | कमलेश तिवारींच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; शिवसेना नेत्याची ऑफर 

कमलेश तिवारींच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; शिवसेना नेत्याची ऑफर 

Next

मुंबईः हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना नेते अरुण पाठक यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अरुण पाठक यानं कमलेश यांच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. व्हिडीओत तो म्हणतो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये झालेल्या माझ्या भावाच्या हत्येचा निषेध नोंदवतो. त्या मारेकऱ्यांचं मुंडकं उडवणाऱ्यांना 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे. त्यासाठी माझी सर्व संपत्तीही विकून टाकेन. कमलेश तिवारींची निर्दयी हत्या करणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत, जोपर्यंत त्यांना पोलीस पकडत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. जेव्हा त्यांचा गळा चिरला जाईल, तेव्हाच मला समाधान मिळेल, असंही अरुण पाठक म्हणाला आहे. 

कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, 2015ला या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला 1.5 कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात भगवे कपडे परिधान करून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला हल्लेखोरांनी कमलेश यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांनी कमलेश यांच्यावर गोळीबार केला. तसेच मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने त्यांच्यावर वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कमलेश यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

Web Title: shivsena leader rs 1 crore reward for beheading kamlesh tiwaris killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.