संजूबाबाची पार्टी पोलिसांनी थांबवली

By Admin | Updated: April 16, 2016 02:47 IST2016-04-16T02:47:31+5:302016-04-16T02:47:31+5:30

तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा भोगून बाहेर आलेला सिने अभिनेता संजय दत्तबाबत पुन्हा एकदा नवीन वाद उद्भवला. संजय दत्तने त्याच्या वांद्रे पाली येथील ’इंपेरियल हाईट्स

Sanjubabachi party stopped the police | संजूबाबाची पार्टी पोलिसांनी थांबवली

संजूबाबाची पार्टी पोलिसांनी थांबवली

मुंबई : तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा भोगून बाहेर आलेला सिने अभिनेता संजय दत्तबाबत पुन्हा एकदा नवीन वाद उद्भवला.
संजय दत्तने त्याच्या वांद्रे पाली येथील ’इंपेरियल हाईट्स’च्या टेरेसवर आयोजिलेल्या पार्टीमुळे शेजाऱ्यांना पोलिसांकडे मदतीची धाव घ्यावी लागली. त्यामुळे पहाटे चारच्या सुमारास खार पोलिसांनी संजू बाबाला चांगलाच हिसका देत पार्टी थांबविण्यास सांगितली.
वांद्रे पाली येथील ’इंपेरियल हाईट्स’मध्ये संजय दत्त आणि मान्यता दत्त राहतात. गुरुवारी रात्रीच्या सुमारास संजय दत्तने या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन केले होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या संजू बाबाच्या पार्टीने स्थानिकांची झोप उडविली. अखेर वैतागलेल्या त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खार पोलीस तेथे पहाटे चारच्या सुमातास दाखल झाले. पोलिसांच्या अचानक झालेल्या एन्ट्रिने सारेच चक्रावले. पार्टीचा सुरु असलेला धिंगाणाही शांत झाला.
या प्रकरणी घटनेची नोंद करत कुठलीही तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Sanjubabachi party stopped the police