वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:36 AM2020-06-06T01:36:54+5:302020-06-06T01:37:06+5:30

तीव्र नाराजी : वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप

In the sanctity of the ST workers' movement due to salary fatigue | वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवू नका, असे आदेश असतानाही एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तिन्ही विभागांच्या अनेक एसटी कर्मचाºयांचे वेतन थकीत ठेवले आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाºयांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील अनेक कर्मचाºयांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत असल्याने कर्मचाºयांना घर कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे. महामंडळाला वेतन देण्याची जाग येत नसल्याने कर्मचारी एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागांतून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या तिन्ही विभागांतील काही चालक व वाहकांना जितके दिवस कामावर हजर होते, तितक्याच दिवसांचे वेतन एसटी महामंडळाने दिले आहे. याउलट संपूर्ण महिना गैरहजर असलेल्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाºयांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाºयांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे जीवाची पर्वा न करता सेवा देणाºया कर्मचाºयांना वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र यावर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी अडचणीत सापडले असून या संकटकाळात आर्थिक चणचण त्यांना भासत आहे. परिणामी, एसटी कर्मचारी आंदोलन करण्याचा भूमिकेत आहेत.

मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही विभागांच्या कर्मचाºयांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. कर्मचाºयांना येत्या दोन दिवसांत वेतन मिळेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला. वेतन न झाल्यास कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस,
महाराष्ट्र एसटी कामगार सेना

Web Title: In the sanctity of the ST workers' movement due to salary fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.