नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे; उपाध्यक्षपदी अरुण धोटे यांची एकमताने निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:23 IST2026-04-27T18:23:08+5:302026-04-27T18:23:17+5:30
नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नगराध्यक्षांनी त्यांचे तसेच रणजीत चव्हाण आणि परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांचे अभिनंदन केले.

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे; उपाध्यक्षपदी अरुण धोटे यांची एकमताने निवड
मुंबई: नगर परिषदा महासंघाच्या महत्त्वपूर्ण सभेत कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची अध्यक्षपदी, तर राजुरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
अंधेरी पश्चिम येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक राजभवन येथील संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या सभेला संस्थेचे अध्यक्ष तथा परिषदेचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण अध्यक्षस्थानी होते. महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यांसह अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेत सर्व सदस्यांच्या एकमताने रुचिता घोरपडे आणि अरुण धोटे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. याच वेळी कार्यकारिणीच्या इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली.
नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नगराध्यक्षांनी त्यांचे तसेच रणजीत चव्हाण आणि परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, या बैठकीत राज्यातील नगरपालिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाकडे संयुक्त निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.