रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:16 IST2020-12-03T04:16:22+5:302020-12-03T04:16:22+5:30

मुंबई : कोरोनाच्या काळात रिक्षा, टॅक्सी चालकांचे नुकसान झाले आहे. भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे. ...

Rickshaw, taxi travel will be expensive | रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

मुंबई : कोरोनाच्या काळात रिक्षा, टॅक्सी चालकांचे नुकसान झाले आहे. भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे. त्याला परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या काही दिवसांत रिक्षा, टॅक्सी प्रवास दाेन रुपयांनी महागणार आहे.

रिक्षाचे सध्याचे मीटर भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयाने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २१ रुपयांवरून भाडे २२ रुपये झाले होते. तर याच वर्षात रिक्षाच्याही भाडेदरात एक रुपयाची वाढ झाली होती. ही भाढेवाढ हकिम समितीनुसार प्रत्येक वर्षी दिली जात होती. परंतु या समितीच्या सूचना प्रवाशांच्याही हिताच्या नसल्याने त्याविरोधात प्रवासी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यानंतर एकसदस्यीय खटुआ समितीची शिफारस करण्यात आली, परंतु रिक्षा, टॅक्सीच्या भाडेदरावर मात्र काही निर्णय झाला नाही.

प्रश्न मार्गी लागणार

रिक्षा, टॅक्सी चालक संघटनांची नुकतीच परिवहन मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. काही वर्षांत भाडेवाढ झाली नाही, कोरोनात रिक्षा, टॅक्सी चालकांचे मोठे नुकसान झाले. रिक्षा आणि टॅक्सीला दोन रुपये भाडेवाढ मिळण्याची शक्यता आहे. यासोबत रिक्षा, टॅक्सी कल्याणकारी मंडळ, परवाना बंद या मुद्द्यावरही चर्चा झाली, त्याला परिवहनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

- राजेंद्र देसाई, सरचिटणीस ,महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना

Web Title: Rickshaw, taxi travel will be expensive