खरेदीसाठी उडाली झुंबड

By Admin | Updated: April 21, 2015 05:48 IST2015-04-21T05:48:26+5:302015-04-21T05:48:26+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताला नवीन खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडत आहे. विशेषत: सोने, वाहन, नवीन घर यांची खरेदी

Pulled up for the purchase | खरेदीसाठी उडाली झुंबड

खरेदीसाठी उडाली झुंबड

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताला नवीन खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडत आहे. विशेषत: सोने, वाहन, नवीन घर यांची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात केली जाते. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकराजाच्या उत्साहामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून गृहोपयोगी वस्तूंसह सोने, वाहन व स्थावर मालमत्तेच्या बाजारपेठेत कोटींची उड्डाणे होण्याची शक्यता आहे.
या दिवशी केलेल्या शुभकार्याचे अक्षयफळ मिळते. महाभारत युद्ध याच दिवशी संपले आणि द्वापार युगाचा समारोपही याच तिथीला झाला, अशी आख्यायिका आहे. या दिवशी एखादे शुभकार्य करावयाचे असल्यास पंचांग पाहण्याची गरज नसते, असे मानले जाते.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. स्मार्टफोनची बाजारपेठ अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर फुल्ल होत आहे. तर लहान मुलांसाठी सायकल, तसेच फर्निचर, किचन मटेरियलसह उन्हाळ्यासाठी फॅन, फ्रीज आणि कुलर या वस्तूंची मागणी वाढत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Pulled up for the purchase