कांदिवलीत गोळीबारात एक जखमी; पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: November 6, 2015 02:11 IST2015-11-06T02:11:57+5:302015-11-06T02:11:57+5:30

कांदिवलीमध्ये गुरुवारी कपड्याचे व्यापारी दक्षेश शाह (४१) यांची पैशांची बॅग हिसकावण्यात आली. चोरांनी केलेल्या गोळीबारात शाह जखमी झाले.

One injured in Kandivli firing; Attempt to tear money bag | कांदिवलीत गोळीबारात एक जखमी; पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न

कांदिवलीत गोळीबारात एक जखमी; पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न

मुंबई : कांदिवलीमध्ये गुरुवारी कपड्याचे व्यापारी दक्षेश शाह (४१) यांची पैशांची बॅग हिसकावण्यात आली. चोरांनी केलेल्या गोळीबारात शाह जखमी झाले.
शाह हे एका कामाचे पैसे घेण्यासाठी आले होते. शंकर लेन परिसरातून ते पैसे घेऊन निघाले. मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताच, त्याने बंदुकीने शाह यांच्यावर गोळी झाडली, शिवाय २५ हजार रुपये असलेली बॅग घेऊन ते पसार झाले. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One injured in Kandivli firing; Attempt to tear money bag