पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ‘त्या’ बातम्या - विखे

By Admin | Updated: September 2, 2015 01:30 IST2015-09-02T01:30:45+5:302015-09-02T01:30:45+5:30

आपण काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात जाणार, या बातम्यांमुळे आपली करमणूक होत असली तरी सातत्याने आपल्या नावाचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पसरवले जात आहेत़

The 'news' due to the turmoil in the party | पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ‘त्या’ बातम्या - विखे

पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ‘त्या’ बातम्या - विखे

मुंबई : आपण काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात जाणार, या बातम्यांमुळे आपली करमणूक होत असली तरी सातत्याने आपल्या नावाचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पसरवले जात आहेत़ त्याची आपण सायबर क्राइम विभागात तक्रार केली असून, असे मेसेज कोण पसरवत आहे याची चौकशी करण्याची मागणी केल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आपण आज औरंगाबादला होतो. पण आपण दिल्लीत अमित शहा यांना भेटल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते. त्याची तक्रार आपण केली असली तरी यामागे कोण आहे असे विचारले असता विखे म्हणाले, माहिती नाही पण ज्यांना कोणाला विरोधी पक्षनेते होण्याची घाई झाली असेल असे लोक हे असले मेसेज फिरवत असतील, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. काँग्रेस पक्षात कोणाला विरोधी पक्षनेते पदाची स्वप्नं पडू लागली आहेत, असे विचारले असता विखेंनी त्यावर बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The 'news' due to the turmoil in the party