Nesco will provide 1500 beds and machines from the MLA fund for Covid Center says Subhash Desai | Coronavirus Mumbai Updates : "नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा, कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार"

Coronavirus Mumbai Updates : "नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा, कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार"

मुंबई - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त ( विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त ( पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.

डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली. दरम्यान, या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरच गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे सुभाष देसाई यांनी मान्य केले व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील असे स्पष्ट केले.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल. रेमेडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. 

डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात यात भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना देसाई यांनी दिल्या. नेस्को संकुलात आतापर्यंत 1,17,000 व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज 6000 व्यक्तींचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nesco will provide 1500 beds and machines from the MLA fund for Covid Center says Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.