वांद्रे येथील गृहप्रकल्पात १९ फ्लॅट्सची परस्पर विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 07:49 IST2026-05-17T07:48:48+5:302026-05-17T07:49:04+5:30

बांद्रा पूर्व येथील निर्मलनगर परिसरातील ‘विशाल आशियाना’ हा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला प्रकल्प माडये याच्या राजहंस बिल्डर्स अँड डेव्हलपर्समार्फत विकसित करण्यात येत होता.

Mutual sale of 19 flats in a housing project in Bandra vishal ashiana fraud | वांद्रे येथील गृहप्रकल्पात १९ फ्लॅट्सची परस्पर विक्री

वांद्रे येथील गृहप्रकल्पात १९ फ्लॅट्सची परस्पर विक्री

;लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रा पूर्व येथील ‘विशाल आशियाना’ प्रकल्पातील १९ फ्लॅट्सची परस्पर विक्री करून ११.५१ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर वामन रामचंद्र माडये यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सेठीया इन्फास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक बसंतराज सेठीया (६१) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनंतर निर्मलनगर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

बांद्रा पूर्व येथील निर्मलनगर परिसरातील ‘विशाल आशियाना’ हा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला प्रकल्प माडये याच्या राजहंस बिल्डर्स अँड डेव्हलपर्समार्फत विकसित करण्यात येत होता. २९ ऑक्टोबर २०१० रोजी माडये आणि सेठीया इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्यात संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. करारानुसार प्रकल्पातील विक्रीयोग्य क्षेत्रफळात ३० टक्के हिस्सा माडये यांचा, तर ७० टक्के हिस्सा सेठीया इन्फास्ट्रक्चरचा निश्चित करण्यात आला होता.

मालमत्तांवर तृतीय पक्षाचा हक्क नाही
करारातील अटींनुसार प्रकल्पातील सर्व फ्लॅट्स विक्री करण्याचे अधिकार सेठीया इन्फास्ट्रक्चरकडे होते. तसेच माडये याने या मालमत्तांवर तृतीय पक्षाचा हक्क नसल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ६ जानेवारी २०११ रोजी ‘स्वराज असोसिएट्स’ या भागीदारी संस्थेत सेठीया इन्फास्ट्रक्चरला भागीदार करण्यात आले. या करारानुसार बसंतराज सेठीया यांची व्यवस्थापकीय भागीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रकल्पासंदर्भातील सर्व व्यवहार करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले होते. २०१८ मध्ये बसंतराज सेठीया यांच्यावर तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. उपचारानंतर त्यांनी पुन्हा प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर धक्कादायक माहिती त्यांच्यासमोर आली. 
 

Web Title : बांद्रा परियोजना में 19 फ्लैटों की अवैध बिक्री पर बिल्डर के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : बांद्रा की 'विशाल आशियाना' परियोजना में 19 फ्लैट बेचने पर बिल्डर वामन माडये के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज। सेठीया इन्फ्रास्ट्रक्चर को बिना अनुमति के फ्लैट बेचकर 11.51 करोड़ रुपये का धोखा देने का आरोप है।

Web Title : Builder booked for illegally selling 19 flats in Bandra project.

Web Summary : Builder Waman Madaye booked for fraud, selling 19 flats in Bandra's 'Vishal Ashiana' project. He allegedly defrauded Sethia Infrastructure of ₹11.51 crore by selling flats without authorization, violating a joint development agreement.