Mumbaikars use water sparingly! There will be no water supply in Dadar, Prabhadevi and other areas on this day | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! दादर, प्रभादेवीसह अन्य भागांत 'या' दिवशी पाणीपुरवठा होणार नाही

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! दादर, प्रभादेवीसह अन्य भागांत 'या' दिवशी पाणीपुरवठा होणार नाही

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ व ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे.

सदर काम दिनांक २ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होऊन ते दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामुळे सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 


ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

१. जी दक्षिण
बुधवार दिनांक २.१२.२०२० रोजी दुपारी २ ते ३ (डिलाईल रोड);
दुपारी ३.३० ते सायं. ७
(सिटी सप्लाय)
परिसर:- ना. म. जोशी मार्ग,
बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ);
या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

२. जी उत्तर
बुधवार दिनांक २.१२.२०२० रोजी सायं. ४ ते ७; तसेच सायं. ७ ते रात्री १०
परिसर:- एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर;
या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही

३. जी दक्षिण
गुरुवार दिनांक ३.१२.२०२० रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५  (डिलाईल रोड)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग
या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

जी दक्षिण
गुरुवार दिनांक ३.१२.२०२० रोजी पहाटे ४ ते सकाळी ७  (क्लार्क रोड)
परिसर:- धोबी घाट, सातरस्ता; या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbaikars use water sparingly! There will be no water supply in Dadar, Prabhadevi and other areas on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.