Mumbai Municipal Corporation announces bonus of Rs. 15,000 for employees | मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस जाहीर
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस जाहीर

मुंबई - मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पालिकेने दिवाळी भेट दिली आहे. पालिकेकडून कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी  पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी ठरावीक बोनस जाहीर करण्यात येतो. मात्र यावेळी ऐन दिवाळीपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच पुढच्या काही दिवसांत राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने दिवाळीला सव्वा महिन्याचा अवधी असतानाच बोनस जाहीर केला आहे. 


Web Title: Mumbai Municipal Corporation announces bonus of Rs. 15,000 for employees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.