मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:07 IST2021-09-18T04:07:36+5:302021-09-18T04:07:36+5:30

मुंबई : विविध देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ...

Megablock tomorrow on the Central, Harbor railway line | मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : विविध देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येईल व त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत मुख्य मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

Web Title: Megablock tomorrow on the Central, Harbor railway line