महापौरांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:06 IST2021-07-21T04:06:47+5:302021-07-21T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मंगळवारी ...

The mayor was finally discharged from the hospital | महापौरांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज

महापौरांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे महापौरांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निधनाची वार्ता प्रसारमाध्यमातून झळकू लागल्याने एकच खळबळ उडाली. अखेर त्यांनी स्वतः ट्विट करीत आपली प्रकृती उत्तम असून ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.

दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत आहे, अशा शब्दात रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत महापौरांनी निरोप घेतला.

Web Title: The mayor was finally discharged from the hospital