मराठी माणूस दादरमध्येच राहणार

By Admin | Updated: June 17, 2015 03:09 IST2015-06-17T03:09:05+5:302015-06-17T03:09:05+5:30

मेट्रो ३ प्रकल्पामुळे दादरमधील काही मराठी कुटुंबे बाधित होणार असल्याचे वृत्त आल्यानंतर दादरकरांनी धसका घेतला होता. अखेर या रहिवाशांना शिवसेनेच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.

Marathi people will remain in Dadar | मराठी माणूस दादरमध्येच राहणार

मराठी माणूस दादरमध्येच राहणार

मुंबई : मेट्रो ३ प्रकल्पामुळे दादरमधील काही मराठी कुटुंबे बाधित होणार असल्याचे वृत्त आल्यानंतर दादरकरांनी धसका घेतला होता. अखेर या रहिवाशांना शिवसेनेच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी माणूस दादरबाहेर फेकला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दादरमधील मेट्रो ३ प्रकल्पबाधित भाडेकरू नागरिकांना घेऊन मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे, माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर, आमदार भरत गोगावले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन भोसले या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी दादरमधील मराठी माणूस अन्य ठिकाणी कोठेही स्थलांतरीत केला जाणार नाही. मेट्रो ३ साठी एकाही भाडेकरूला अन्य ठिकाणी हलवणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्या वेळी यशवंत विचले, अजित कदम, शेखर भगत, सूर्यकांत लाड, अमित प्रधान, सुभाष गोखले, अवधूत मेंगळे, विलास गावडे, कदम, गुप्ते, आॅस्टिन मार्टीन हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Marathi people will remain in Dadar