वृद्ध, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:44 IST2026-05-08T11:39:26+5:302026-05-08T11:44:38+5:30

एनसीआरबीने जारी केली गुन्ह्यांची आकडेवारी

Maharashtra ranks second in violence against elderly and women; Madhya Pradesh, Uttar Pradesh lead | वृद्ध, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आघाडीवर

वृद्ध, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आघाडीवर

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

Marathi News : मुंबई : महाराष्ट्रातील महिला, वृद्ध असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहेत. २०२४ च्या अहवालानुसार, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ४७,९५४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. धक्कदायक बाब म्हणजे २५ जणींची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. तर वृद्धांंवरील अत्याचाराचे ४,९१८ गुन्ह्यांची नोंद पोलिस दफतरी झाली आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे.

Video - "चोर-चोर, TMC चोर";निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी

एनसीआरबीने २०२४ मध्ये देशभरात घड़लेल्या गुह्यांची आकडेवारी जारी केली. यामध्ये राज्यात एकूण ३ लाख ८३ हजार ४४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात अन्य राज्यांच्या तुलनेत महिला, ज्येष्ठांंवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात महिलांवरील अत्याचाराचे ४ लाख ४१ हजार ५३४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. उत्तर प्रदेश (६६,३९८) पाठोपाठ महाराष्ट्रात ४७९५४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्रात दोषसिद्धी दर ७९.५ टक्के आहे. २०२३ मध्ये हाच आकडा ४७१०१ तर २०२२ मध्ये ४५३३१ होता.

१८५ वृद्धांची हत्या, जबरी चोऱ्यांसाठी टार्गेट

२०२४ मध्ये १८५ वृद्धांंच्या हत्येची नोंद करण्यात आली आहे. दरोडे घालण्याच्या ९ घटना समोर आल्या. तर वृद्धांंना लक्ष्य करत चोरीचे १ हजार २६३ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या २४६ गुह्यांची नोंद यात करण्यात आली आहे. वृद्धांंच्या बलात्काराचे १३ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत.

२५ जणींची बलात्कार करून केली हत्या

राज्यात २०२४ मध्ये ३०९६ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या. यामध्ये राजस्थान (४,८७१) पहिल्या स्थानी आहे. यामध्ये १३ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

२५ जणींची बलात्कार, गँगरेपनंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, स्टोकिंगचे २३६२ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तर, १५५ जणी हुंडाबळीच्या शिकार ठरल्या आहे. याशिवाय पोक्सोचे ९,२४२ गुन्हे नोंद आहेत.

दुसरीकडे देशभरात वृद्धावरील अत्याचाराचे एकूण ३२ हजार ६०२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात ४ हजार ९१८ गुह्यांची नोंद आहे. २०२३ मध्ये ५११५ गुन्हे नोंदविण्यात आले होते. तर २०२२ मध्ये ५०५९ गुन्हे नोंद आहे. यामध्ये मध्यप्रदेश (५८७५) पहिल्या स्थानावर आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्र या गुन्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता.

Web Title : महाराष्ट्र में महिलाओं, बुजुर्गों के खिलाफ अपराध दूसरे स्थान पर: एनसीआरबी डेटा

Web Summary : एनसीआरबी 2024 के आंकड़ों के अनुसार, महाराष्ट्र महिलाओं और बुजुर्गों के खिलाफ अपराधों में देश में दूसरे स्थान पर है। राज्य में महिलाओं के खिलाफ 47,954 अपराध दर्ज किए गए, जिनमें 25 बलात्कार के बाद हत्याएं शामिल हैं। वरिष्ठ नागरिकों के खिलाफ अपराधों की संख्या 4,918 रही, जिनमें 185 हत्याएं दर्ज की गईं। मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश इन श्रेणियों में सबसे आगे हैं।

Web Title : Maharashtra ranks second in crimes against women, elderly: NCRB data

Web Summary : Maharashtra ranks second nationwide in crimes against women and the elderly, according to NCRB 2024 data. The state recorded 47,954 crimes against women, including 25 rapes resulting in murder. Crimes against senior citizens numbered 4,918, with 185 murders reported. Madhya Pradesh and Uttar Pradesh lead in these categories.