'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 19:23 IST2024-04-12T19:19:47+5:302024-04-12T19:23:11+5:30
Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे.

'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर
Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. काल महायुतीची नांदेडमध्ये सभा झाली,या सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी शाह यांनी 'नकली शिवसेना'म्हणतउद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावरुन आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
" शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी सुरू केली त्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता, नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? मग त्यांचे दुसरे पार्टनर अमित शाह आले ते म्हणाले शिवसेना नकली आहे , तुम्ही बोला आम्ही भाजपाला भाडXX जनता पक्ष आहे म्हणतो भले आम्हाल तुम्ही नकली शिवसेना म्हणून टींगल करा. पण, शाह तुमच्या गाडीत अस्सल भाजपाची लोक किती राहिलेत बघा की सगळ्या स्टेपन्या बसल्या आहेत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
"त्यांच्या पक्षाच कोणीच नाही म्हणून मी यांना भाडXX म्हणतो, सगळे याला फोड, त्याला फोड, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात पण तुम्ही प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय भाषण पूर्ण का होत नाही. अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. तिकडे काहीच बोलत नाहीत. पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे, संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा', असंही ठाकरे म्हणाले.