अंगणवाडी सेविकांना मिळणार लॅपटॉप

By Admin | Updated: February 7, 2015 23:09 IST2015-02-07T23:09:50+5:302015-02-07T23:09:50+5:30

राज्यात प्रथमच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील अंगणवाडी मुख्य सेविकांना लॅपटॉप देऊन हायटेक करण्यात आले आहे.

Laptops to get Aanganwadi sevaks | अंगणवाडी सेविकांना मिळणार लॅपटॉप

अंगणवाडी सेविकांना मिळणार लॅपटॉप

ठाणे : राज्यात प्रथमच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील अंगणवाडी मुख्य सेविकांना लॅपटॉप देऊन हायटेक करण्यात आले आहे. गावपाड्यांतील अंगणवाडी केंद्रांतील बालके, कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांची दैनंदिन माहिती अपडेट करण्यासह लॅपटॉप हाताळण्याचे तांत्रिक ज्ञान या सेविकांना ठाणे जिल्हा परिषद देत आहे.
येथील वर्तक सभागृहात या सेविकांची कार्यशाळा घेतली जात आहे. विविध स्वरूपाची माहिती लॅपटॉपवर भरण्याचे कौशल्यपूर्ण ज्ञान या सेविकांना दिले जात आहे. यामुळे सर्व तालुक्यांतील अंगणवाडी केंद्रांच्या दप्तराचे ओझे टळले आहे. याशिवाय, हायटेक झालेल्या या सेविकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे १२५ मुख्य सेविका दैनंदिन माहिती लॅपटॉपवर अपडेट करून सर्व विभागांना आॅनलाइन माहिती उपलब्ध करून देत आहेत. यात होणारे नवनवीन बदल कार्यशाळेच्या माध्यमातून शिकवले जात आहेत. गावपाड्यांतील प्रत्येक घराची इत्थंभूत माहिती ठेवणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविकांची रोजच्या कामांची माहिती आॅनलाइन करण्यात आली आहे. या लॅपटॉपद्वारे संबंधित गरोदर, स्तनदा मातांना आणि अन्यही महिलांना प्रेझेंटेशन देऊन त्यांना सुयोग्य माहिती दिली जात आहे. कुपोषणग्रस्त बालकांच्या दैनंदिन आहाराची माहिती, त्यापासून काय बदल व सुधारणा होत आहेत, महिलांना कितपत आकलन होत आहे, आदी इत्थंभूत माहिती तज्ज्ञांना आॅनलाइनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.

४कुपोषणग्रस्त बालकांच्या दैनंदिन आहाराची माहिती, त्यापासून काय बदल व सुधारणा होत आहेत, महिलांना कितपत आकलन होत आहे, आदी इत्थंभूत माहिती तज्ज्ञांना
आॅनलाइनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.

Web Title: Laptops to get Aanganwadi sevaks