'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:17 IST2024-08-05T10:14:11+5:302024-08-05T10:17:05+5:30

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला.

in mumbai two trains of mono broke down passengers got stuck traffic stopped due to technical fault  | 'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प 

'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प 

मुंबई : संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी प्रवाशांना अर्धा ते एक तास ताटकळावे लागले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

वडाळा स्थानकाजवळ एका मोनो गाडीत बिघाड झाला. त्यानंतर या गाडीतील प्रवाशांना गाडीतून वडाळा स्थानकात उतरविण्यात आले. मात्र थोड्या वेळाने दुसऱ्या गाडीतही बिघाड झाला. परिणामी या दोन्ही गाड्या दुरुस्तीसाठी डेपोमध्ये पाठविण्यात आल्या. मात्र, या बिघाडामुळे प्रवाशांना सुमारे अर्धा ते एक तास स्थानकात ताटकळत थांबून राहावे लागले.

मोनो मार्गिकेवर आधीच रविवारी कमी गाड्या धावतात. त्यामुळे दोन गाड्यांमधील अंतर अधिक असते. त्यातच बिघाड झाल्याने पुढील गाडीसाठी प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे प्रवाशांनी 'मोनो'च्या कारभारावर टीका केली.

Web Title: in mumbai two trains of mono broke down passengers got stuck traffic stopped due to technical fault