विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी कॅप पहिल्या  फेरीचे प्रवेश २१ मेपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:07 IST2026-05-15T15:06:58+5:302026-05-15T15:07:48+5:30

11th admission 2026 schedule: अकरावी ऑनलाइन नियमित प्रवेशाच्या शून्य फेरीबाबत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

Important news for students, admission for the first round of 11th cap from 21st May | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी कॅप पहिल्या  फेरीचे प्रवेश २१ मेपासून

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी कॅप पहिल्या  फेरीचे प्रवेश २१ मेपासून

मुंबई : अकरावी ऑनलाइन नियमित प्रवेशाच्या शून्य फेरीबाबत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली. ती संबंधित विद्यार्थ्याला त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये शुक्रवारपर्यंत दिसेल. कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर केले असून, २१ ते ३० मेदरम्यान अर्ज, प्रवेश व विविध प्रक्रिया याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याचे आवाहन माध्यमिक  शिक्षण विभागाने केले.

 २१ ते २२ मे : अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरणे, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, भाग-१ व भाग-२ मधील माहिती भरणे, पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करणे, आवश्यक कागदपत्रे व गुणांची माहिती अपलोड करणे, अर्ज अंतिम करून माहितीची पडताळणी करणे, तर कोटा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी भाग एक दुरुस्ती करता येईल, ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक करता येईल.

 २३ ते २६ मे :   कनिष्ठ महाविद्यालय वाटप (अलॉटमेंट) प्रक्रिया होईल. 

 २६ मे :   विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करणे, गुणवत्ता व आरक्षणानुसार प्रवेश यादी तयार करणे, विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत एसएमएसद्वारे माहिती देणे, विद्यार्थ्यांनी लॉगिन करून प्रवेश स्थिती तपासणे, संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश यादी प्रसिद्ध करणे, कोट्या अंतर्गत अर्ज केलेल्या  विद्यार्थ्यांची यादी कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये दर्शविणे. 

 २६ ते २८ मे :   प्रवेश निश्चिती प्रक्रिया, विद्यार्थ्यांनी मिळालेला प्रवेश स्वीकारणे, संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करणे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश मंजूर करणे, कोट्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे.  विद्यार्थ्यांनी कोट्या अंतर्गत प्रवेश निश्चित करणे.

२९ मे २०२६ :   रिक्त जागा जाहीर करणे, प्रवेशानंतर महाविद्यालयांनी शिल्लक राहिलेल्या जागांची माहिती प्रसिद्ध करणे, पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध जागांची यादी जाहीर करणे.
 
३० मे २०२६ :   दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार

Web Title : 11वीं कक्षा सीएपी पहला दौर प्रवेश 21 मई से शुरू, जानें विवरण।

Web Summary : 11वीं कक्षा के सीएपी का पहला दौर 21 मई से शुरू। छात्र 22 मई तक पंजीकरण करें, प्राथमिकताएं चुनें और दस्तावेज अपलोड करें। कॉलेज आवंटन: 23-26 मई। 28 मई तक प्रवेश की पुष्टि करें। रिक्तियां 29 मई को घोषित; दूसरा दौर 30 मई को।

Web Title : Class 11 CAP first round admissions from May 21 announced.

Web Summary : Class 11 CAP round 1 starts May 21. Students register, select preferences, upload documents by May 22. College allotment: May 23-26. Admission confirmation by May 28. Vacancies announced May 29; second round schedule on May 30.