चारित्र्याच्या संशयावरून कुर्ल्यात पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 02:50 AM2020-01-24T02:50:05+5:302020-01-24T02:50:23+5:30

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केल्याची घटना कुर्ला येथे घडली. या प्रकरणी पती दिनेश इंगळे (३०) याला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

husband murdered his Wife in Kurla | चारित्र्याच्या संशयावरून कुर्ल्यात पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून कुर्ल्यात पत्नीची हत्या

Next

मुंबई : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केल्याची घटना कुर्ला येथे घडली. या प्रकरणी पती दिनेश इंगळे (३०) याला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

व्ही.बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीतल (३०) ही पतीसोबत राहण्यास होती. २०११ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी अचानक बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महिलेचा शोध घेत तिला घरी आणण्यात आले. पुढे दोघांनी नव्याने संसाराची सुरुवात केली. मात्र शीतलचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये खटके उडू लागले. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास यावरूनच त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात इंगळेने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीच्या मानेवर, छातीवर वार करण्यास सुरुवात केली.

स्थानिकांकडून याबाबत समजताच व्ही.बी. नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि शीतल यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या
संशयी वृत्तीमुळे शीतल यांना त्याच्यासोबत राहायचे नव्हते. मात्र दोन मुलांमुळे त्या तेथे राहत असल्याचीही माहिती समोर
आली आहे. या प्रकरणी इंगळेला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: husband murdered his Wife in Kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.