आघाडी सरकारने वाटोळे केले

By Admin | Updated: October 13, 2014 02:03 IST2014-10-13T02:03:25+5:302014-10-13T02:03:25+5:30

माणगांव, खालापूर : रायगड जिल्ह्यातील शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ची तुंबडी भरून जनतेचे वाटोळे केल

The government has misled the government | आघाडी सरकारने वाटोळे केले

आघाडी सरकारने वाटोळे केले

अलिबाग, माणगांव, खालापूर : रायगड जिल्ह्यातील शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ची तुंबडी भरून जनतेचे वाटोळे केल. शिवसेनेने असे पातक केलेले नाही आणि करणारही नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी माणगांव, अलिबाग व कर्जत येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मतदारांना दिली आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार रवी मुंढे व महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
सुनील तटकरे व जयंत पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुंबई दिल्ली कॉरिडोर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसेल तर शिवसेना त्यांची एक एकर काय एक इंच देखील जमीन संपादित करू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी देऊन सुनील तटकरे यांच्या पुतण्याला आडवे करण्याचे तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
महिलांवर अत्याचार करणारे राष्ट्रवादीचे माजी गृह मंत्री आर आर पाटील यांनी अलीकडे बलात्काराविषयी केलेल्या वादाग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार ठाकरे यांनी घेतला. राष्ट्रवादीचे मंत्री राहिलेले लक्षुमण ढोबळे , आमदार दिलीप वाघ यांची उदाहरणे त्यांनी दिली. महिलांवरील अत्याचार करणार्यांना राष्ट्रवादीने पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. (वार्ताहर)

 

Web Title: The government has misled the government