अंधेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:08+5:302015-08-31T00:24:08+5:30

अंधेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

Golden Year of the Andheri King | अंधेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

अंधेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

धेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष
अंबाजी माता मंदिराचा देखावा
मुंबई :
मुंबईत नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीचा राजा मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आझाद नगर येथील अंधेरी राजाच्या मंडपात गुजरात येथील प्रसिद्ध अंबाजी मातेच्या मंदिराचा देखावा उभारण्याचे काम अहोरात्र सुरु असून २५0 कलाकार मेहनत घेत आहेत.
गुजरात-राजस्थान सिमेजवळ वसलेले प्रसिद्ध अंबाजी माता मंदिर देशातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशातील ५१ शक्तिपिठांपैकी हे एक महत्वाचे शक्तिपीठ आहे. दरवर्षी विविध प्रसिद्ध मंदिरांचे हुबेहूब देखावे उभारणार्‍या मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षात अंबाजी माता मंदिर साकारण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केशव तोंडवलकर यांनी सांगितले. मंडळाने केलेल्या आवाहनानुसार अंधेरीच्या राजाचा सुवर्णमुकुट बनवण्यासाठी अनेक भक्तांनी सुवर्णदान केले असून गणेश चतुर्थीपुर्वी अंधेरीचा राजाचा देखणा सुवर्णमुकुट तयार होईल, असे मंडळाचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले.

Web Title: Golden Year of the Andheri King