साडेचौदा हजार लीटर ऑइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:41+5:302021-02-05T04:29:41+5:30

दोघांना अटक : सीबी कंट्रोलची कुर्ल्यात कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण ...

Fourteen and a half thousand liters of oil seized | साडेचौदा हजार लीटर ऑइल जप्त

साडेचौदा हजार लीटर ऑइल जप्त

दोघांना अटक : सीबी कंट्रोलची कुर्ल्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या सीबी कंट्रोलच्या पथकाने कुर्ल्यात (प.) क्रांतीनगर येथे छापा टाकून १४ हजार ५०० लीटर काळे ऑइल जप्त केले. ७० ड्रममधील या पेट्रोलियम द्रव्याची किंमत ११ लाख ३६ हजार ८६० रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून दुकान मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामजी गौतम, रामदुलार पासी यांना अटक केली असून दुकानचालक नझीर खान व रमेश सोनी हे फरार आहेत. कुर्ल्यातील क्रांतीनगरामधील बीएमके कंपाऊंडमध्ये एका गोदामात जळके ऑइल म्हणून ओळखले जाणारे पेट्रोलियम द्रव्याची काळा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती सीबी कंट्रोलच्या पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्री तेथे छापा टाकून काळे ऑइल असलेले ७० ड्रम जप्त केले. दोघा कामगारांनाही अटक केली. याबाबत स्थानिक विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.....................

Web Title: Fourteen and a half thousand liters of oil seized